भाजप पक्षश्रेष्ठींकडून घटनेची पडताळणी सुरू
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील एक वजनदार मंत्री ‘सेक्स स्कँडल’मध्ये गुंतल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हा मंत्री दक्षिण गोव्यातील असून त्याचे हे कारनामे उत्तर गोव्यात चालू असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेतली असून या घटनेची पडताळणी सुरू केल्याची माहिती हाती आली आहे. याप्रकरणी गिरीश चोडणकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.
सदर मंत्र्याचे उत्तर गोव्यात फार्म हाऊस असून तेथे त्याचे हे कारनामे सुरू असल्याचे समोर आले आहे. या मंत्र्याचा अलीकडेच वाढदिवस होता आणि तो त्याने रंगेलपणाने साजरा केल्याची चर्चा होत आहे. फार्महाऊसजवळ असलेल्या एका पंचायतीच्या तऊण महिला पंचाला घेऊन हा उद्योग चालू होता. रात्री उशिरा हे प्रकरण चालू असताना आपली पत्नी घरी नसल्याने पतीने चौकशी केली तेव्हा ती मंत्र्याच्या फार्म हाऊसवर गेल्याचे कळले. पतीने तेथे धाव घेऊन त्यांना रंगेहाथ पाहिले, असा दावा करण्यात आला आहे.
मंत्री महोदय त्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळले असून पतीने याचा जाब विचारताच त्याला दमदाटी करण्यात आली. पतीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला डांबून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्याची सुटका केली, अशी माहिती प्राप्त झाली आहे. मंत्र्यानेच महिला पंचाचे अपहरण कऊन तिच्याशी अश्लील चाळे केल्याची चोडणकर यांनी व्टिटरवऊन माहिती दिली आहे. ही बातमी प्रसारमाध्यमात वेगाने पसरत असून त्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.
मंत्र्यानेच पोलिसांना फोन कऊन हे प्रकरण दडपण्याचा तसेच तक्रार घेण्यात येऊ नये म्हणून प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर मंत्र्याचे गोव्यासह दिल्लीत मोठे वजन असून बदनामी नको म्हणून हे प्रकरण दाबण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी अजून तरी पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी याची नोंद घेतली असून त्याचा लोकसभा निवडणुकीवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी म्हणजे विधानसभा निवडणूक 2022 होण्याअगोदर तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचे सेक्स स्कँडल गाजले होते. त्याचा भांडाफोड प्रथम काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनीच केला होता. नंतर तेव्हाचे काँग्रेस नेते व उमेदवार संकल्प आमोणकर यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा कऊन त्या मंत्र्यास व भाजपला जेरीस आणले होते. एवढे होऊनही भाजपने 2022च्या निवडणुकीत त्याच मंत्र्यास उमेदवारी दिली परंतु सेक्स स्कँडलाचा फटका बसल्याने त्या मंत्र्यावर पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आणि आमोणकर विजयी झाले. परंतु ते फार काळ काँग्रेसमध्ये टिकले नाहीत आणि नंतर ते भाजपवासी झाल्याचा इतिहास आहे.









