संपुआमध्ये सामील नाही एआययुडीएफ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसाम काँग्रेसने मोठा निर्णय घेत बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटशी असलेले नाते तोडले आहे. काँग्रेस आणि अजमल यांच्या पक्षाने मागील विधानसभा निवडणूक आघाडी करत लढविली होती. अजमल यांचे आता संपुआशी कुठलेच देणेघेणे नाही, अजमल हे आता भाजपचे मुखपत्र ठरले आहेत, अजमल यांनी आसाम विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. अजमल हे भाजपसोबत काम करत आहेत. बदरुद्दीन यांची काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधातील टिप्पणी अस्वीकारार्ह आहे. अजमल आणि शर्मा यांनी काँग्रेस आणि त्याच्या नेतृत्वाची बदनामी करण्याच्या एकमात्र उद्देशाने एकत्र काम केल्याचे स्पष्ट होत आहे. अजमल हे एआयएमआयएम यासारख्या काही अनय पक्षांप्रमाणेच भाजपच्या हातचे बाहुले ठरले असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.









