ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप नेते नेहमी काँग्रेसला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून लक्ष करतात. घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) केला आहे. आत काँग्रेसनेही घराणेशाहीवरून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. जे मोदी घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला जात असल्याचं बोलत आहेत त्यांच्या पक्षात २००९ मध्ये १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातून होते. आता सद्यस्थितीत भाजपातील २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातील आहेत, असा आरोप काँग्रेसने केलाय.
काँग्रेसने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला असा काँग्रेसवर आरोप करणाऱ्या भाजपमध्ये २००९ मध्ये १२ टक्के खासदार हे नेत्यांच्या कुटुंबातून होते आशी टीका केली आहे. कॉंग्रेसने भाजप खोटं बोलत आहे. जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असंही काँग्रेसने म्हटलं.
काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हणाले, “भाजपाचे २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातून आलेत. अनेक केंद्रीय मंत्री देखील राजकीय घराण्यांमधून आले आहेत. असं असताना भाजपाने घराणेशाहीवर बोलणं समजण्यापलीकडचे आहे.”
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीवरील टीकेवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींनी घराणेशाही राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीला आणि विकासाला अडथळा ठरत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तोच धागा धरत काँग्रेसने २००९ पासून आजपर्यंतच्या भाजपामधील घराणेशाहीची आकडेवारी सांगितली आहे.