नेत्यांनी जास्त वेळ काँग्रेस कमिटीत येऊन लोकांचे ऐकून घ्यावे
सांगली : काँग्रेसची पडझड होत असताना एक चकार शब्द सुद्धा न काढता परिस्थितीकडे तटस्थ नजरेने पाहत बसलेल्या काँग्रेस नेत्यांबर पश्नाच्या आजीमाजी नगरसेवकांनी चांगलाच रोष व्यक्त केला. आ. विश्वजीत कदम आणि खा.विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रकार घडला.
काँग्रेस नेत्या, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी पश्न सोडल्यानंतर सुमारे दोन आठवड्यानंतर पश्न सोडून न गेलेल्या कार्यकर्त्यांची आणि आजी माजी नगरसेवकांची, जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रातील कार्यकर्त्यांची गुपचूप बैठक बोलवण्यात आली होती. शनिवारी रात्री झालेल्या या बैठकीस पक्षाचे विविध पदावर काम केलेले कार्यकर्तेही उपस्थित होते.
जयश्री पाटील यांनी पश्न सोडल्यानंतर विचलित झालेल्या या पदाधिकाऱ्यांना प्रथमच बोलावण्यात आले होते. या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पक्षाची अधिकृत बैठक घेण्याची मागणी केली. आपण कोणत्या पद्धतीने लढायचे याबाबत स्पष्टपणे सांगा अशी मागणी केली. बहुतांश नगरसेवकांनी खा. विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना प्रश्न विचारले.
लढायचे आहे पण कोणत्या पद्धतीने, महाविकास आघाडी करायची किंवा नाही याबद्दल स्पष्टपणे सांगा अशी मागणी केली. किती बदल झाले तरी आम्ही पक्ष सोडलेला नाही. आम्हाला बळ देण्यासाठी नेत्यांनी भूमिका स्पष्टपणे मांडाव्यात, तळागाळातील कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाबी, नेत्यांनी जास्त वेळ काँग्रेस कमिटीत येऊन लोकांचे ऐकून घ्यावे.
चार-पाच महिन्यांबर निवडणुका आल्या असताना काँग्रेससारखा पश्न निष्क्रिय दिसतो अशी लोकांमध्ये चर्चा व्हायला नको. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना लढण्यासाठी बळ द्या अशी मागणी नगरसेवकांनी केली.
बैठकीत माजी महापौर किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, राजेश नाईक, मंगेश चव्हाण, विशाल कलगुटगी, अण्णासाहेब कोरे, फिरोज पठाण, शुभांगी साळुंखे, उमेश पाटील, आरती वळीवडे, रवींद्र वळीवडे, उदय पवार यांच्यासह विविध गटातटाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसकडून होत असलेल्या तोडफोडीची, तीन तीन पक्षांकडून येत असलेल्या निमंत्रणाची देखील चर्चा झाल्याचे समजते.
बंद खोलीत चर्चा
मनपा क्षेत्रातील नगरसेवकांच्या भावना तीव्र आहेत लक्षात घेऊन प्रत्येकाला एकटे बोलावून चर्चा करण्यात आली. आ. कदम यांनी आघाडीबद्दल जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा बैठक घेतली जाईल असे सांगितल्याचे समजते.








