कोल्हापूर :
शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या गारीवडे (ता. गगनबावडा) येथील माझ्या भाषणातील त्रोटक मुद्दा छेडछाड करून काँग्रेसच्या पदाधिक्रायांनी एका महिलेचा अपमान केला असून या घटनेचा आपण निषेध करत असल्याचे तिसंगी मतदारसंघाच्या माजी जि.प. सदस्या मेघाराणी जाधव यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले.
गारिवडे येथे बुधवारी दुपारी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आपण बोलताना महिलांना उद्देशून महायुती सरकारने लाडक्या बहिणींना प्रति महिना 1500 रुपये दिले आहेत,आता मतदानाला जाताना आपल्या पतिराजांना आमच्या उमेदवाराला मतदान करा नाहीतर त्यांच्याकडून 3000 रुपये घ्या असे मी भाषणात म्हटले होते. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या व्हिडिओमध्ये छेडछाड करून फक्त मी महिलांना धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाजिक कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या महिलेचा काँग्रेसकडून इतका अवमान आणि मानहानी होत असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय होत असेल याचा विचार करावा. अशा पद्धतीने महिलांचा अवमान करण्राया काँग्रेस पदाधिक्रायांचा मी जाहीर निषेध करत असून असे व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसने पातळी सोडली आहे.मला या घटनेचा प्रचंड मानसिक त्रास झाला आहे, घरातील कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते असे खोटे व्हिडिओ व्हायरल करून ते महिलांचा अपमान करीत आहेत. अशा पद्धतीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवण्राया व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आपण करीत आहे. महिलांचा अपमान करण्राया काँग्रेसवाल्यांना निवडणुकीत जागा दाखवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.माझ्या भाषणाचा राजकारणासाठी वापर करण्राया प्रवृत्तींचा मी जाहीर निषेध करीत आहे असे त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.








