बेळगाव उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असिफ (राजू ) सेठ यांचा प्रचार दौरा पांगुळ गल्ली परिसरात झाला.
बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांना दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असून. गुरुवारी सायंकाळी त्यांनी पांगुळ गल्ली, कसाई गल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या व यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्यां जाणून घेतल्या.
त्यांच्या समस्यांचे निराकरण, व्यवसाय वाढण्यास मदत करणे आणि परिसरातील दुकान मालकांच्या समस्यांचे निवारण करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे ते म्हणले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.










