कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित बसयात्रा दिनांक ११ जानेवारी पासून बेळगावहुन सुरू होत असल्याची माहिती केपीसीसी उपाध्यक्ष बसवराज रायरेड्डी यांनी दिली.
आज बेळगावच्या जिल्हा काँग्रेस भवनात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महात्मा गांधीजींची जिथे काँग्रेस अधिवेशन झाले होते तिथून या यात्रेला चालना मिळणार आहे. बेळगाव जिल्ह्यात संयुक्त बसयात्रा झाल्या नंतर ४ दिवस विश्रांती असेल, मग त्यानांतर विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्वनेते उत्तर कर्नाटकातील ११२ विधानसभा क्षेत्र आणि १४ लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत.
पत्रकार परिषदेला काँग्रेस ग्रामीणचे उपाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहर अध्यक्ष राजू सेठ, गजू धरनाईक व इतर नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.









