निपाणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम पाटील यांना मतदारसंघात चांगला पाठिंबा लाभत आहे.
आज मानकापूर येथे अनेक काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निपाणी विधानसभा निवडणूक २०२३ साठी पाठिंबा दर्शवला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी विविध मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ व कसनाळ येथील दलित समाजाचे पदाधिकारी व युवक उपस्थित होते.










