नूंह जिल्ह्यातील नूंह, फिरोजपूर झिरका आणि पुन्हानाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नूंह हा जिल्हा मुस्लीम बहुल आहे. अपेक्षेप्रमाणे या मुस्लीमबहुल जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काँग्रेसची सरशी झाली आहे. नूंह येथे मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येथे धार्मिक ध्रूवीकरण झाल्याचे मानले जाते.
नूंह मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आफताब अहमद हे 46,871 मतांसह विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर आयएनएलडीचे ताहिर हुसैन राहिले आहेत. भाजपचे संजय सिंह यांना केवळ 15,810 मते प्राप्त झाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
तर फिरोजपूर झिरका मतदारसंघात काँग्रेसचे मामन खान हेच विजयी झाले आहेत. आयएनएलडीचे मोहम्मद हबीब हे दुसऱ्या तर भाजपचे नसीम अहमद हे तिसऱ्या स्थानावर राहिले. पुन्हाना मतदारसंघात काँग्रेसचे मोहम्मद इलियास यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार रहीश खान आणि भाजप उमेदवार मोहम्मद एजाज खान यांना पराभूत केले आहे.









