विशेष प्रतिनिधी / पणजी
कृषी जमीन व कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने शेतजमीन ही जास्तीत जास्त शेतकऱ्याला विकता येईल आणि त्यात शेतीच करावी लागेल दुसरे काही करता येणार नाही यासाठी केलेल्या दुऊस्ती कायद्याचे महाराष्ट्रातील नेते राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचे अभिनंदन कऊन महाराष्ट्र सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या एका जाहीर सभेत हजारो नागरिकांसमोर गोवा सरकारच्या कृषी विषयक दुऊस्ती कायद्याचा उल्लेख कऊन त्याचे भरभऊन कौतुक केले आहे. हा कायदा कोणी केला? गोवा सरकारने! तिथे कोणत्या पक्षाचे सरकार आहे? भाजपचे. हा कायदा काय सांगतो तर गोव्यातील शेतजमिनी अन्य कोणाला विकता येणार नाही व त्या जागी कोणतेही बांधकाम करता येणार नाही. या शेतजमिनी केवळ शेतकऱ्यांनाच विकता येतील आणि त्यातही केवळ शेतीच करावी लागेल असा नियम आहे. असा कायदा गोवा सरकार कऊ शकते तर इथे महाराष्ट्र का नाही कऊ शकत? आपल्याकडे कोकणात या वा अन्य ठिकाणी कोणीही येताहेत व जमिनी खरेदी करीत आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणते निवेदन केलेय? त्यांनी म्हटलेले आहे की, आम्ही गोव्याचा गुरगाँव किंवा छत्तीसपूर कऊ देणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही उत्तरेतून येणाऱ्या नागरिकांना इथे जमिनी मिळवू देणार नाही असा त्याचा अर्थ होतो तो समजवून घ्या, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले व त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील भाजप प्रणित आघाडी सरकारला कानपिचक्या दिल्या.









