प्रतिनिधी /वास्को
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या महाअंतिम फेरीत प्रवेश केलेल्या वास्कोतील युवा गायक नवाब शेख यांचा वास्कोतील हॉटेल सुप्रिमच्या व्यवस्थापनातर्फे गौरव करण्यात आला. येत्या शनिवारी व रविवारी रात्री कलर्स मराठीवर महअंतीम फेरी होणार आहे.
कलर्स मराठीच्या महाअंतीम फेरीत प्रवेश करून युवा गायक नवाब शेख याने गायन क्षेत्रात गोव्याचे नाव उज्वल केल्याबद्धल वास्कोतील सुप्रिम हॉटेल व्यवस्थापनातर्फे गौरव करण्यात आला. यावेळी हॉटेलचे सरव्य़वस्थापक समीर पालेदार, नवाब शेख यांचे संगीत क्षेत्रातील गुरू शरद मठकर, मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, समाजसेवक तुळशिदास फळदेसाई व हॉटेलचा कामगार वर्ग उपस्थित होता.
प्रारंभी समीर पालेदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नजमा खान यांनी केले तर संदीप आचरेकर यांनी आभार मानले.









