विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून सभात्याग
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुरा विधानसभेच्या कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या 5 आमदारांवर शुक्रारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला आहे. त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष विश्वबंध सेन यांनी कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या 5 आमदारांना एक दिवसासाठी निलंबित केले आहे. यात माकपचे आमदार नयन सरकार, काँग्रेसचे सुदीप रॉय बर्मन आणि टिपरा मोथाचे तीन आमदार सामील आहेत. बृस्वकेतु देववर्मा, नंदिता रियांग आणि रंजीत देववर्मा अशी निलंबनाची कारवाई झालेल्या टिपरा मोथाच्या तीन आमदारांची नावे आहेत. विधानसभा अध्य क्षांच्या निर्णयांनतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर आहे. भाजपच्या एका आमदाराने विधानसभेच्या कामकाजादरम्यान अश्लील चित्रफित पाहिली असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात गंगाजल आणले होते.