वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत सोमवारी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गोंधळासह सुरु झाले. सत्तारुढ द्रमुकच्या घटक पक्षांच्या घोषणाबाजीदरम्यान राज्यपाल आर.एन. रवि यांनी स्वतःचे पारंपरिक संबोधन केले आहे. तर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत भाषणावरून झालेल्या वादादरम्यान राज्यपालांनी सभागृहातून वॉकआउट (सभात्याग) केला.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना केवळ राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेले भाषण पटलावर घेण्यास आणि राज्यपालांकडून पारंपरिक अभिभाषणात जोडण्यात आलेल्या हिस्स्यांना हटविण्यास सांगण्यात आले होते. याचा निषेध म्हणून राज्यपालांनी वॉकआउट केला आहे. सत्तारुढ द्रमुकच्या घटक पक्षाच्या आमदारांच्या घोषणाबाजीदम्यान राज्यपाल सभागृहाला संबोधित करत होते. या आमदारांनी ‘तमिळनाडू वाझगवे’ आणि ‘एंगल नाडू तमिळनाडू’ (तामिळनाडू आमची भूमी आहे) अशा घोषणा दिल्या. राज्यात काँग्रेस, भाकप आणि माकप हे सत्तारुढ द्रमुकच्या आघाडीत सामील आहेत.









