रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी एकूण ९२९ जागांसाठी ७२८ विद्यार्थ्यांना या प्रवेशाची लॉटरी लागली आहे. त्यासंदर्भातील एसएमएस संबधित विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवले जात आहेत. दरम्यान आरटीई पोर्टलची तांत्रिक यंत्रणा कोलमडल्याने पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने प्रवेशाची माहिती पाहण्यासाठी पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
आरटीईनुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ९२ शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी ९२९ जागांसाठी ११०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाईन लॉटरीत १ हजार ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.