डिगस : प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग मध्ये विद्यार्थी व अध्यापक वर्गासाठी सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनचे एपीआय मनीष कोल्हटकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच पार पडले. दिवसेंदिवस समाजात सायबर क्राईमचे गुन्हे वाढीस लागत आहेत. आणि या गुन्ह्यांमध्ये युवक वर्ग हा भरकटला जात आहे. तरी या विषयावर युवकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते. तसेच सोबत सेफ्टी मेन्टेन्स अबाउट स्नेक बाईट या विषयावर देखील कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या डॉ शेवाळ, डॉ. मनीष धकाटे, डॉ बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनिता रामानंद , डॉ मनोज जोशी ,डॉक्टर नितीन भोकने, डॉ. मांगलकर, डॉ. कुलकर्णी मॅडम उपस्थित होते.









