ओटवणे / प्रतिनिधी
Condolences to Shiv Sena’s Sawantwadi Uptaluk Chief Balu Malkar
कारिवडे पेडवेवाडी येथील राजाराम विठ्ठल माळकर (७६) यांचे सोमवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, कारीवडे देवस्थान मानकरी दादा आणि बाबा गावकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत माळकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. शिवसेनेचे सावंतवाडी उपतालुका प्रमुख संदीप ऊर्फ बाळू माळकर यांचे ते वडील होत तर भाजपाचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अशोक माळकर यांचे ते काका होत.









