दोडामार्ग – वार्ताहर
Condolences to Lavu Mirkar
दोडामार्ग बाजारपेठेतील श्रीमती स्नेहलता शांताराम मिरकर ( वय – 73 ) यांचे काल गुरुवारी सायंकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्या ‘आका’ या नावाने प्रचलित होत्या. दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर, शिक्षक अंकुश मिरकर तसेच व्यापारी सतीश मिरकर व संदीप मिरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्या अतिशय मनमिळावू होत्या. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे, असा मोठा परिवार आहे. दोडामार्गातील अनेकांनी मिरकर कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.









