प्रतिनिधी / काणकोण
माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि तत्कालीन पणजी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका पावलिना फर्नांडिस यांचे सुपुत्र जेसुस्ले फर्नांडिस यांचे पोर्तुगाल येथे निधन झाले आहे. जेसुस्ले यांचा पोर्तुगालमध्ये स्वत:चा व्यवसाय होता. त्यामुळे ते त्याच ठिकाणी स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काणकोण मतदारसंघातील इजिदोर फर्नांडिस यांच्या असंख्य समर्थकांनी व चाहत्यांनी पणजीला त्यांच्या निवासस्थानी जाऊन फर्नांडिस दापंत्याची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. एरव्ही पेडे, लोलये येथील आपल्या मूळ घरातच राहणाऱ्या फर्नांडिस यांनी दोन दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा केला होता. अलीकडच्याच दिवसांत त्यांचा मुक्काम पणजीत राहिला. फर्नांडिस यांनी आपल्या मुलांना नेहमीच राजकारणापासून बाजूला ठेवले.









