दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग बाजारपेठेतील पूर्वीपासूनच्या खानावळ / हॉटेल व्यवसायिक श्रीम. सुनिता दिनकर नानचे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा -बांबोळी येथे रुग्णालयात उपचार चालू होते. त्या 76 वर्षांच्या होत्या. अतिशय हळव्या व मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सुपरिचित होत्या. दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे तसेच व्यापारी राजन नानचे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे ,सुना, मुलगी ,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे .









