वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे धाकटे बंधू राममूर्ती नायडू यांचे शनिवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 72 वर्षे होते. मागील बरेच दिवस ते आजारी होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हैदराबाद येथील ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. भावाच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेत्यांनी चंद्राबाबू नायडू यांचे सांत्वन करत शोकभावनाही व्यक्त केल्या आहेत.









