शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील रस्ते, बांधकाम यासह अन्य कामे करणाऱ्या कामगारांची उपासमार सुरू आहे. काम बंद असल्याने अनेक कामगार इतरत्र कामाच्या शोधात असून ठेकेदारांची बिले थकल्याने ठेकेदार हतबल झाले आहेत. बँकेतून काढलेली कर्ज व व्याज कसं फेडायची याचीही चिंता ठेकेदारांना लागून राहिली आहे.
शिरोळ तालुक्यातील किमान अडीशे ते तीनशे ठेकेदार आहेत. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका, पाणीपुरवठा विभाग यासह अन्य काम करणारे ठेकेदार असून गेले दोन महिने झाले शंभर टक्के काम करूनही फक्त 20% बिले अदा केल्याने सर्वच ठेकेदार हतबल झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच ठेकेदार काम बंद ठेवल्याने हजारो मजूरांवर आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाने गहू, तांदूळ मोफत दिल्यामुळे तोच तेवढा आधार त्यांना मिळत आहे. बहुसंख्य कामगार घरीच बसूनच आहेत तर अनेक कामगार कामाच्या शोधात आहेत. अनेक ठेकेदारांची कामेही मंजूर असतानाही ती कामे करण्यास ठेकेदार राजी नाहीत. तसेच खनिज कायदेशीर परवानगी नसल्यामुळे दगड, माती, खडी उत्खन बंद असल्याने यावर काम करणारे शेकडो कामगारही ही बेकार झाले आहेत.”
शिरोळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, विभाग, नगरपालिका ,ग्रामपंचायतीची शंभर टक्के कामे पूर्ण केले असतानाही 17 ते 20 टक्के बिल अदा करण्यात आली आहेत 80% बिले नसल्याने ठेकेदारांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे कामे बंद असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत दोन महिन्यापासून बिलाची वाट पाहून अखेर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आंदोलने केली निवेदनही दिली परंतु त्यांची बिले अद्याप मिळदिली परंतु त्यांची बिले अद्याप मिळालेली नाहीत.
याबाबत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की गेले दोन महिने झाले बिले नसल्याने कामे ठप्प आहेत कामगारांना वेळच्यावेळी पगार द्यावा लागतो सध्या बँकेचे काढलेले कर्ज व व्याज कसं फेडायची ही चिंता लागू राहिली असल्याचे त्यांनी सांगितले त्याबाबत कॉन्ट्रॅक्टर अभीद गवंडी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून बिले मिळतील या आशेवर गेली दोन महिने संबंधित विभागाकडे हेलपाटे मारत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने तातडीने ठेकेदाराची बिले अदा करावी जिल्ह्यातील मंत्री ,खासदार, आमदार यांनी याकामी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.









