Com. Kumar Shiralkar: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर (Com. Kumar Shiralkar Death) यांचे रविवारी, 2 ऑक्टोबर रोजी रात्री निधन झाले.नाशिकमधील कराड रुग्णालयात (Nashik Karad Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी चार वाजता शहादा येथील मोडमधील कॉ.बी.टी.रणदिवे हायस्कूल प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत.मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी काम केले आहे.
कसदार लेखन आणि चिंतन करणारे मार्क्सवादी विचारवंत अशी शिरवाळकरांची ओळख होती. मार्क्स, बुद्ध,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक शिदोरीवर त्यांचा बौद्धिक पिंड जोपासला होता.कुमार शिराळकर यांनी आदिवासी,शेतमजूर,ऊसतोडणी कामगार, दलित आदी घटकांच्या समस्या मांडणाऱ्या पुस्तिकांचे लिखाण केले होते. 1974 साली प्रकाशित झालेल्या ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ हे त्यांचे पुस्तक चांगलेच गाजले होते. शिराळकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत ग्रामीण भागात तरुण कार्यकर्ते तयार झाले होते. जातीअंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती आणि ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मीमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्माधतेचे राजकारण आदी विविध विषयांवर शिराळकर यांनी लेखन केले.‘नवे जग, नवी तगमग’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते.
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आदर्श
Next Article प्रशासनातर्फे वीरसौधमध्ये म.गांधी- शास्त्री जयंती








