पुणे / प्रतिनिधी :
आर्थिक फसवणूक तसेच बेकायदेशीररीत्या पैसे हस्तांतरित केल्याच्या गुन्ह्यावरून पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका संगणक अभियंत्यास ओडिसा पाेलिसांच्या विशेष तपास पथकाने चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अभिजीत संजय जांबुरे ( वय-२९, मु. रा. सातारा) असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. अभिजीत जांबुरे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून, पुण्यातील हिंजवडी आयटी क्षेत्रात एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. गुजरातमधील आनंदा येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. ओडिसातील भुवनेश्वर येथे त्याला अधिक चाैकशीसाठी तपास यंत्रणांनी नेले आहे.









