रहिवाशांची बुडाकडे मागणी : अधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव : चन्नम्मानगर येथील वॉर्ड क्र. 14 अंतर्गत येणाऱ्या चार उद्यानांचा पुनर्विकास करण्यात आला. स्मार्ट सिटी अंतर्गत बुडा प्रशासनाने उद्यानांचा विकास केला. परंतु, शेवटच्या टप्प्यातील काम अद्याप अपूर्ण असून मागील सहा महिन्यांपासून कोणतेही काम सुरू नसल्याची तक्रार रहिवाशांनी बुडा अधिकाऱ्यांकडे केली. उद्यानांच्या पुनर्विकासासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, शेवटच्या टप्प्यातील काम अर्धवट असल्याने अनेक समस्या येत आहेत. बुडा अधिकाऱ्यांनी चन्नम्मानगर परिसराला भेट देऊन अपूर्ण कामाची माहिती जाणून घेतली. शिल्लक राहिलेले काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी आर. सी. नगर प्लॉट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद गुंजीकर, अक्षयकुमार कुलकर्णी, अनिल चौगुले, सुनील होसमनी, अरुण पुणेकर, संतोष बाळीकाई यासह इतर उपस्थित होते.









