जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदेंची सूचना : मनरेगा विकास आढावा बैठक
बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) 2024- 25 साठी सुरू केलेली कामे चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत. शाळांसाठी स्वच्छतागृहे, क्रीडांगण, स्वयंपाकघर, शाळा संरक्षण भिंत एलडब्लूएम विभाग, ग्राम पंचायत इमारत यासारखी कामे महिना अखेरीस पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केली. ता. पं. चे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रविवारी जि. पं. सभागृहात संयुक्तपणे झालेल्या मनरेगाच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावऊन शिंदे बोलत होते.
मानव दिनांची अंमजवजावणी पाहिल्यास गतवर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाली आहे. मजुरांना मनरेंगातर्गत वेळीच कामे देऊन मार्च-2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करावे. 2022- 23 मध्ये 75.19 टक्के, 2023-24 मध्ये 53.20 व 2024-25 मध्ये केवळ 27.35 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक ग्राम पंचायत हद्दीमध्ये मनरेगांतर्गत कामे पूर्ण न झाल्याचे दिसून येते. मार्च अखेर कामे पूर्ण करावीत, अशी सूचना तांत्रिक संयोजक व साहाय्यकांना शिंदे यांनी केली. 2024- 25 मध्ये सुरू केलेली 13 एसएचजी शेडची कामे पूर्ण करावीत. 2025-26 सालात जिह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीला एक याप्रमाणे कामांची निवड करून पूर्णत्वास न्यावीत.
सामाजिक कार्यासंबंधीची 25 प्रकरणे बाकी असून शनिवारी झालेल्या अभियानात एकाच दिवसात 473 एटीआर पूर्ण केली हे प्रशंसनिय आहे. उर्वरित कामासाठी समिती बनवून चर्चेद्वारे कामे पूर्णत्वास न्यावीत, असा सल्लाही दिला, जि. पं. चे योजना संचालक (डीआरडीए) रवी बंगारेप्पनवर, एडीपीसी बसवराज एन., जिल्हा आयइसी संयोजक प्रमोद घोडेकर, डीएमआयएस मौनेश चौडकी, अकौन्ट्स मॅनेजर मंजुनाथ मळगली तसेच जिह्यातील सर्व तालुका पंचायतींचे कार्यकारी अधिकारी, सहाय्यक संचालक, ग्रामीण रोजगार, तांत्रिक संयेजक, टीएमआयएस, तांत्रिक सहाय्यक तसेच जि.पं. चे कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.









