आमदार प्रवीण आर्लेकर यांची अधिकाऱ्यांना सूचना : नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या,पेडणे येथे मान्सूनपूर्व कामासंबधी अधिकारी, सरपंच, नगराध्यक्ष यांची बैठक
पेडणे : पावसाळ्dयापूर्वी पेडणे मतदारसंघातील सर्व कामे हाता वेगळी करा, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. पाणी, वीज समस्या तसेच रस्ते, गटार, नाले उपसा व नागरिकांना चांगली व सुरळीत सेवा देण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, जेणेकरून पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या समस्या उदभवणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मान्सूनपूर्व कामांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. पेडणे येथे सरकारी विश्रामगृहात आयोजित केलेल्या या बैठकीला पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, पेडणे गटविकास अधिकारी मनोहर परवार, पेडणे पालिकेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, चांदेल – हसापूरचे सरपंच तुळशिदास गावस, कोरगाव सरपंच समील भाटलेकर, धारगळचे सरपंच अनिकेत साळगावकर, खाजने- अमेरे-पोरस्कडे सरपंच निशा हळदणकर, तोरसे सरपंच पार्थना मोटे, वारखंड – नागझर सरपंच गौरी जोसलकर, वझरी सरपंच अनिल शेट्यो, पेडणे वीज खात्याचे सहाय्यक अभियंते वाटू सावंत, अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार, जलस्त्राsत खात्याचे अधिकारी मनीष कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता शिवानंद मळीक, पेडणे कृषी विभाग अधिकारी प्रकाश राऊत, पेडणे तालुका शिक्षणाधिकारी, पालिका अभियंता दीपाली परब, राष्ट्रीय महामार्गचे प्रतिनिधी आदी विविध खात्यांचे अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत आमदार प्रवीण आर्लेकर तसेच सरपंचानी विविध सूचना केल्या. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे आणि यासाठी पेडण्यातील गटार व्यवस्था, तसेच झाडेझुडपे कापून घ्यावीत, राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत जे रस्ते आहेत त्याच्यावर पडलेले ख•s बुजवून घ्यावेत. यावेळी सरपंचांनी पेडण्यात पाण्याची मोठी समस्या असल्याचे सांगितले. यावेळी पेडणे पाणी विभाग अभियंते सोमा नाईक यांनी मे महिन्यात चांदेल येथील नव्याने उभारण्यात आलेला 15 एम.एल.डी पाणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पेडणेतील पाणी समस्या सुटणार असल्याचे सांगितले. चांदेल येथे पावसाळ्यात पूर आल्यानंतर पाणी प्रकल्पावर असलेले आलेले पंप हाऊसमध्ये पाणी शिरते व पंप नादुऊस्त होतात. त्यामुळे अनेक दिवस नळाला पाणी येत नाही. यासाठी जादा पंपची तरतुद करावी जेणेकऊन पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
वीज वाहिन्यावर आलेली झाडे कापा, त्यासाठी वन विभाग तसेच पेडणे अग्निशामक दलाने ही कामे लवकर करावी, अशी सूचना आमादार प्रवीण आर्लेकर यांनी केली. पेडणे तालुक्यासाठी आपत्ती निवारण संपर्क विभाग असल्याचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी सांगितले. आपत्ती जनक विभाग पेडणे उपजिल्हाधिकारी संकुलात आहे. एखादी मोठी समस्या उद्भवल्या या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा तसेच आमदार प्रवीण आर्लेकर, स्थानिक सरपंचांनी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदार यांच्याकडे संपर्क साधावा. कुठलीही मोठी समस्या झाल्यास आपल्याला तातडीने फोन करून कळवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच तुळशीदास गावस, सरपंच निशा हळदणकर, सरपंच अनिकेत साळगावकर, सरपंच पार्थना मोटे, कोरगावचे सरपंच सामील भाटलेकर, अनिल शेट्यो आदींनी विविध सूचना केल्या. आपल्या गावातील समस्या सोडवण्याचे मागणी यावेळी केली. पावसाळ्dयात अनेक समस्या उद्भवतात यासाठी वीज खात्याने, अग्निशामक दलाने तत्पर राहावे अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या. पावसाळ्dयात वारंवार वीज समस्या असते कार्यालयाचे संपर्क क्रमांक लागत नाही त्यामुळे कोणाकडे तक्रार करणार असा प्रश्न यावेळी सरपंचानी केला. सध्या दुरध्वनी क्रमांक लागत नसल्याने भ्रमणध्वनी दिलेला आहे त्यावर संपर्क करावा असे वीज अभियंते वाटू सावंत यांनी सांगितले. कोनाडी येथे वळणावर मोठे झाड आहे. हे झाड वाहानचालकाना अडथळा निर्माण करते असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. आता याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून सदर झाड वनखात्याने कापून घ्यावा, असे पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे तालुक्यातील विविध सरकारी अधिकाऱ्यांनी पावसाळ्dयात नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कामे करावे, असे आवाहान केले.









