मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह, नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे काम सुरू आहे. हे काम वेगान करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. तसेच सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.








