खानापुरात उद्या कार्यक्रम : रस्ते, वीज, शिक्षण, ग्रा. पं., तहसीलदार कार्यालय, सर्वच खात्यांबाबत समस्यांचा महापूर
खानापूर : शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय सामान्य जनतेच्या शासन दरबारातील अडीअडचणी निवारण्यासाठी जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जनतेला शासकीय कामे सुलभ व्हावीत, अशी सरकारची योजना आहे. त्यानुसार fिजल्हा, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. बुधवार दि. 18 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय जनता दर्शन हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास तालुक्यातील जनता आपली गाऱ्हाणी घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे चर्चेतून दिसून येत आहे.शासकीय अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निश्चितच खानापूर तालुक्मयातील जनतेच्या समस्यां निवारणासाठी मोठी गर्दी होण्याची शक्मयता आहे. तालुक्मयात गेल्या काही वर्षापासून रस्ते, बससेवा, खंडित वीजपुरवठा, शिक्षकांची कमतरता, शाळा इमारती, तहसीलदार कार्यालयातील अनागोंदी कारभार, तालुक्मयातील जे. जे. एम पाणीपुरवठा योजनेत झालेली वाताहत, पश्चिम व दुर्गम भागातील वनाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे थांबलेली विकासकामे, ग्राम पंचायतीतील भ्रष्टाचार, खुंटलेली विकासकामे, सामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक, ता., जि. पंचायत कार्यालयातील कामामुळे नागरिक अक्षरशा वैतागलेले आहेत. त्यामुळे जनता दर्शन कार्यक्रमात सर्वच भागातील लोक तक्रारींचे गाऱ्हाणे घेऊन निश्चित मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बस सेवेबाबत तक्रारी होण्याची शक्यता
वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार करूनही भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. तहसीलदार कार्यालयात सामान्य जनतेच्या शेती व इतर कामासाठी होत असलेला विलंब त्यामुळे सामान्य जनतेला तहसीलदार कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या बाबतची तक्रार होण्याची शक्मयता आहे. शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता, शाळा, इमारतींची कामे खोळंबलेली आहेत. पश्चिम भागातील शिक्षण प्रेमींकडून जाब विचारला जाणार आहे. तालुक्मयातील बससेवा गेल्या सहा महिन्यापासून पूर्णपणे कोलमडल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकवेळा आगार प्रमुखांकडे बस सेवेसाठी निवेदने देऊनही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सर्वच विभागातून बस सेवेबाबत मोठ्या तक्रारी होणार आहेत.
समस्या मांडण्यासाठी प्रथमच खुली संधी
जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते फोडले आहेत. प्रत्येक ठिकाणी जलजीवन मिशनचे काम अर्धवट आहे. त्यामुळे या कामाबाबतही तक्रारी होणार आहेत. दुर्गम व जंगल विभागातील विकासकामे वनखात्याच्या आडमुठे धोरणामुळे रखडलेली आहेत. अनुदान मंजूर होऊनही कामांची सुऊवात नाही. वन्य प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतही शेतकरी आपले गाऱ्हाणे या ठिकाणी मांडणार असल्याचे सांगत आहेत. अघोषित लोडशेडिंगमुळे पिके वाया जात आहेत. तालुक्यातील सामान्य जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रथमच खुली संधी मिळत असल्याने सर्वच विभागातून तक्रारी मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.









