श्रीपाद श्रीवल्लभ को-ऑपरेटीव्ह हावसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱयांची पत्रकार परिषदत माहिती
प्रतिनिधी /मडगाव
आणखी एका जमीन घोटाळाप्रकरणासंबंधी खास तपास पथकाकडे लवकरच तक्रार करण्यात येणार असल्याचे श्रीपाद श्रीवल्लभ को-ऑपरेटीव्ह हावसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
मडगावात मंगळवारी दुपारी घेतलेल्या एका पत्रकार परिशषेत सोसायटीचे अध्यक्ष उमाकांत कोरखणकर तसेच विवेकानंद जयराम भिसे, नागेश साळवकर, देवस्थानचे अध्यक्ष दामोदर फडते, संतोष घोडे, शांताराम जांबोडकर, सुषमा काळसेकर, श्वेता नाडकर्णी या पत्रकार परिषदेला या देवस्थानचा अध्यक्षासह सोसायटीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष श्री. कोरखणकर यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की सोसायटीच्या आवारात एक अत्यंत जागृत मंदिर असून अनेकांना त्याची प्रचिती आलेली आहे. मंदिराचे पदाधिकारी या मंदिराची देखभाल पाहात होते. ट्रस्ट रजिस्ट्रर असल्यामुळे त्यांना मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी मंदिर समितीने तोंडी करारने अनुमती दिली.
गेली 15 वर्षे मंदिराचा कारभार हा ट्रस्ट पाहात आहे. कालांतराने सदर ट्रस्ट, हे मंदिर आपले म्हणू लागला. मात्र प्रतिपक्षाचा हा दावा सपशेल खोटा असल्याचे श्री. कोरखणकर यांनी यावेळी सांगितले.
सोसायटीच्या काही सदस्यांना घेऊन तसेच या सोसायटीच्या जमिनीच्या आवाराबाहेरील काही लोकांना मिळून 75 जणांना घेऊन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. प्रत्येकाकडून 500 रुपये मिळून 37,500 रुपये घेऊन ट्रस्ट स्थापन केला. ट्रस्ट स्थापन करतेवेळी ‘इमोबायल’ संपत्ती असावी लागते. मात्र, अशी संपत्ती (इमोबायल) प्रतिस्पर्धी गटाकटे अजुनही नाही. सोसायटीची एकूण जमीन 20,350 चौरस मीटर इतकी असून ही जमीन सोसायटीच्या सदस्यांना दिलेली आहे. एकूण 38 प्लॉट असल्याची माहिती सोसायटीच्या अध्यक्षांनी दिली.
श्रीपाद श्रीवल्लभ को-ऑपरेटीव्ह हावसिंग सोसायटी व श्री श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान ट्रस्ट या दोन वेगवेगळय़ा बाबी होय. प्रतिस्पर्धी गटाने हल्लीच असा दावा केला की वरील दोन्ही बाबीत काहीही संबंध नसून ते वेगवेगळे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ को-ऑपरेटीव्ह हावसिंग सोसायटी ही एक नोंदणीकृत सोसायटी असून या एकूण जमिनीचा मालकी हक्क या सोसायटीकडे आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या प्रतिस्पर्ध्याला हे मंदिर चालवण्यास दिले त्यांनीच या मंदिरावर कब्जा केला. जमिनीची मालकी हक्क सोसायटीकडेच आहे, ट्रस्टकडे नव्हे. मात्र, गेल्या वर्षापासून प्रतिस्पर्धी गटाने असे भासवले की मंदिर आपले आहे असे यावेळी सांगण्यात आले.
जमिनीच्या कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप
जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करुन ही जमीन आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या सोसायटीने 20,350 चौरस मीटर जमीन 10.45 लाख रुपयांना खरेदी केली होती आणि म्हणून या जमिनीचा पूर्ण मालकी हक्क सोसायटीकडे आहे, ट्रस्टकडे नव्हे असे श्री. कोरखणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
जमिनीच्या कागदपत्रात फेरफार केल्याचे समजण्यात आले तेव्हा सोसायटीने एक खास आमसभा बोलावली आणि त्या आमसभेत त्यावर बरीच चर्चा करण्यात आली. प्रतिस्पर्ध्याकडून कदाचित चूक झाली असेल, पोलीस तक्रार करु नका अशी विनंती या सोसायटीच्या काही ज्येष्ठ व्यक्तीनी केल्यामुळे पोलीस तक्रार करण्यात आली नव्हती.
पोलीस तक्रार केलीच तर जमिनीची कागदपत्रे तपास यंत्रणेला किंवा न्यायालयाला देण्यासाठी सर्व कागदपत्रे एका लखोटय़ात सीलबंद करुन ठेवलेली होती आणि अद्यापही त्याचा सील खोललेला नसल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत दाखवून दिले.
प्रतिस्पर्धी गटाने हल्लीच एक पत्रकार परिषद घेऊन वरील सोसायटीचा मंदिराकडे कसलाही हक्क नसल्याचा आरोप केला होता आणि म्हणून प्रतिसपर्दी गटाचा हा आरोप खोडून काढण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचे श्री. कोरखणकर यांनी स्पष्ट केले. 20,350 चौरस मीटर जमीनीचा मालकी हक्क याच सोसायटीकडे असल्याचा दावा सोसायटीच्या अध्यक्षांनी केला.
गेल्या काही दिवसापूर्वी सोसायटीच्या सदस्यांच्या झालेल्या आमसभेत प्रतिस्पर्धी गटाविरुद्ध पुराव्याच्या आधारे पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्याचबरोबर, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घालून सत्याची बाजु पाहावी अशी विनंती श्रीपाद श्रीवल्लभ को-ऑपरेटीव्ह हावसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी या पत्रकार परिषदेत केली.
महिला भाविकांना धमकी दिल्याचा आरोप
यावेळी काही महिला भाविक उपस्थित होत्या. नाम जप करीत असताना प्रतिस्पर्धी गटाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप त्यानी यावेळी केला.









