म. ए. युवा समितीने लिहिले पत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही मराठी व्यापाऱ्यांना कन्नड भाषेमध्ये फलक लावावेत, यासाठी नोटीस देण्यात येत आहे. तसेच मराठी भाषेतील फलक स्वत: महापालिका आयुक्त हटवित असल्याने त्याची तक्रार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने अल्पसंख्याक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेकडून प्रत्येक खासगी आस्थापनावरील व दुकानांवरील फलकांवर सक्तीने 60 टक्के कन्नड भाषेत लिहिण्यात यावे, अन्यथा व्यापारी परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असतानाही केवळ दडपशाही करण्यासाठीचा हा प्रकार असून या अन्यायाची अल्पसंख्याक आयोगाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युवा समितीने केली आहे. पत्रासोबत गुरुवार दि. 19 रोजी फलक हटवितानाची वृत्तपत्रांमधील कात्रणे जोडण्यात आली आहेत.









