स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्या विरोधात येथील पोलिस स्थानकात तक्रार दाखल
उमरगा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल स्टँडअप कॉमेडीमॅन कुणाल कामरा हा विंडबनात्मक व्हिडीओ बनवला. त्यानंतर सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे मुरूम शहरातील व परिसरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. युवासेना मुरूम शहर व सर्कलच्या वतीने,मुरूम पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये कुणाल कामराने वापरलेल्या अपशब्दामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने, महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तींच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवण्याचे काम कुणाल कामरा याने केलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.








