मल्लीकार्जुन खरगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
पणजी : कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणकीतील भाजपचे उमेदवार मलीकंठन राठोड यांच्या विरोधात पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. राठोड यांनी दिलेली धमकी सोशल मिडीयावरून व्हायरल झाली असून त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरातील विविध पेलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत. पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करतेवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीत पाटकर महिला प्रदेशाध्यक्ष बिना नाईक, अमपनाथ पणजीकर, विजय भिके तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीच्या अनुशंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय नेते कर्नाटकात प्रचारसभा घेत आहेत. कॉँग्रेसचेही नेते प्रचार सभा घेत आहे. एका प्रचार सभेत भाजपचे उमेदवार राठोड यांनी जाहिरपणे मल्लीकार्जुन खरगे व त्यांच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र याची पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही. त्यामुळे भाजप सत्तेत लोकशाही आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. असे प्रदेशाध्यक्ष अमीत पाटकर यांनी सांगितले. तक्रार दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मलीकंठन राठ़ेड हा एक सराईत गुंन्हेगार असून त्याच्या]िवरेधात खून, अमली पदार्थ अशा प्रकारच्या 40 हून अधिक तक्रारी नोंद आहेत. यापैकी तीन तक्रारी न्यायलायत सिध्द झाल्या आहेत. अशा प्रकारचे व्यक्ती हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला आहे. असे उमेदवार मतदारांना धमकावून किंवा पैशाचा वापर करूनच निवडणूक जिंकणार आज भाजपला केवळ सत्ता पाहिजे त्यासाठी ते कोणत्याह स्तराला जाऊ शकतात. अशी टीकाही पाटकर यांनी केली आहे.









