तळमावले :
सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत चालली असून त्यामुळे पाण्याचे स्रोत आटू लागले आहे. ग्रामीण भागात पाण्यावाचून पक्ष्यांचे हाल होताना दिसत आहेत. अशा पक्षीजीवांचा घसा माणुसकीत ओला करण्याच्या दृष्टीने पाटण तालुक्यातील असवलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून महक्याचा वापर करून उन्हाने ताहनलेल्या पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शालेय परिसरातील झाडांना महकी बांधून झाडाखालील मडक्यामध्ये बंहगार पाण्याची सोय केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या पक्षीप्रेमाचे परिसरात कौतुक होत आहे कडक उन्हामुळे पाण्याअभावी पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ओढे, नाले, विहिरीमधील पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे हे गरजेचे आहे हे ओळखून पाटण तालुक्यातील असवलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या परिसरात झाडांच्या फांद्यावर मातीची भांडी पाण्याने भरून ठेवली आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पक्ष्यांची पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली आहे.
असवलेवाडी शाळेतील वृक्षावर दररोज कबूतर, बहिरी ससा, सुतारपक्षी, कोकिळा अशा अनेक जातीचे पक्षी पाणी पिण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे हा उपक्रम पुढे चालू ठेवणार असल्याचे विद्याच्यांनी सांगितले वाल्मिक पठारावरील असवलेवाडी परिसरात वाड्यावर राहत असलेल्या लोकांना प्रत्येक वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात भटकंती करून पाणी आणावे लागते. त्यामुळे पाण्याचे महत्व किती आहे हे तेथील लोकांना व शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला चांगलेच माहिती आहे. पक्ष्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
- कौतुकास्पट उपक्रम
पाण्याची गरज व पशुपक्ष्यांचे आयुष्य किती महत्वाचे आहे हे लक्षात घेत असवलेवाडी येथील विद्यार्थी व शिक्षकांकडून हा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असून इतर गावात असे उपक्रम राबविण्याची गरज आहे.
वसंतराव पाटील, निवृत्त वनाधिकारी
- भांड्यातील पाणी पक्ष्यांसाठी वरदान
उन्हामध्ये फिरणाऱ्या पक्षांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून प्राथमिक शाळेच्या परिसरातील प्रत्येक वृक्षावर पाण्याने भरलेली मातीची भांडी ठेवण्यात आली आहे छोट्याशा भांड्यामधील पाणी पक्षासाठी एक प्रकारचे वरदान ठरत आहे. हा उपक्रम आम्ही अनेक वर्षांपासून याबाबत आहे.
रामचंद्र माने, मुख्याध्यापक असवलेवडी शाळा








