आमदार विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन : सदलगा येथे काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांची प्रचार सभा
माणकापूर : देशात लोकशाहि टिकवण्यासाठी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस सरकारची गरज आहे. हे जनतेला आता कळले आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचेच सरकार सतेत येणार असून आमदार गणेश हुक्केरी मंत्री असणार आहेत, असे प्रतिपादन आमदार विश्वजीत पतंगराव कदम यांनी केले. ते सदलगा तालुका चिकोडी येथे काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचार सभेत बोलत होते. येथील विद्यासागर भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार विश्वजीत कदम यांनी पुढे, धरणेच नव्हे तर मतदारसंघातील ओढ्यावर बंधारा घालणारे नेते म्हणजे प्रकाश हुक्केरी आहेत. हुक्केरी पिता-पुत्रांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. पिता प्रकाश हुक्केरी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आमदार गणेश हुक्केरी यांनी घोडदौड सुरू ठेवत वडिलांचा वारसा जपला आहे. त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांनी या भागातील जनतेने हुक्केरी घराण्यावर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवला आहे. यावेळेस राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार हे निश्चित आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लकिार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिद्धराम³या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहिर केलेला जाहिरनामा व गॅरंटी कार्डातील सर्व योजना आम्ही जनसामान्य जनतेपय\त पोहचवू. शिवाय चिकोडी जिल्हा व सदलगा तालुका करणे हे आमचे स्वप्न आहे ते पूर्ण करू असे सांगितले.
मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारकडून जातीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यांच्याकडून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. जातीवादी, भ्रष्ट सरकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. उलट जनसामान्य जनतेचे नेते म्हणून हुक्केरी पिता-पुत्र सर्वांना परिचित आहेत असे सांगितले.
प्रारंभी काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार विश्वजीत पतंगराव कदम यांचा परिचय अँड. रमेश देसाई यांनी करून दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार विश्वजीत कदम व आमदार गणेश हुक्केरी यांचा सत्कार करण्यात आला. सभेस माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, पिरगोंड पाटील, अरुण देसाई, निंबाळकर सरकार -नंदीकर, महादेव मधाळे, महावीर उदगावे, रणजीत पाटील, पुंडलिक खोत, सुनील पाटील, मोहन शितोळे, रघुनाथ देसाई, रवी गोसावी, उदय बदनीकाई, चंद्रकांत पाटील, महबूब काले, संतोष नवले, दिलीप अनुरे, उदयकुमार पाटील, रणजीत देसाई, अभयकुमार पाटील, रवी माळी, सुरेश देसाई, सचिन बिंदगे, कुमार माने, हालू पुजारी, हुवन्ना केशे, महंमद अझरुद्दाrन शेखजी, अण्णासाहेब घोबडे यांच्यासह सदलगा व पाfरसरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन हंसनाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.









