Andheri East Bypoll :भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कम्युनिस्ट पक्षाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबई डबेवाल्यांच्या प्रमुख सदस्यांनी देखील काल उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली..मराठा सेवक संघानेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस पाठिंबा दिला आहे.आता डाव्या पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.तर,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा शिवसेना उमेदवाराला असल्याचे घोषित केले आहे. दरम्यान आता कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिल्याने राजकीय पक्षांचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा रंगली आहे.
मातोश्रीवर पोहोचलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत आदीचा समावेश होता. भाकपच्या शिंष्टमंडळाची भेट शिवसेनेच्या खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर यांनी घेतली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








