‘शाळेत कोणते कौशल्य शिकवले जात नाही?”, “करियरच्या दृष्टीने कोणते कौशल्य अंगी बाणणे आवश्यक आहे?”, “मराठी युवक-युवती इतर राज्यांच्या युवकांच्या तुलनेत कुठे कमी पडतात?”, “दहावी परीक्षेनंतरच्या सुट्टीत पालकांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊन पालकांनी काय शिकवावे?” अशा सर्व प्रश्नचे उत्तर एकच : ‘संवाद कौशल्य!
शालेय जीवनात घोकंपट्टी करून लिहिण्यात दहा वर्षे घालवून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर अचानकपणे अनेक विद्यार्थ्यांना एक पोकळी जाणवते. शाळेतले मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या महाविद्यालयात विखुरलेले असतात, महाविद्यालयाची इमारत, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्वच नवीन असतात. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिल्या आठवड्यात सर्वच मुले-मुली काय शोधतात? ओळखीचे कोणी आहे का? शाळेतले/वर्गातले कोणी दिसल्यावर त्यांना इतके हायसे वाटते की ते समाधानाचा सुस्कारा टाकून त्याच ठराविक जुन्या मित्र-मैत्रिणींचे बोट धरून बसतात कारण तो त्यांचा ‘कम्फर्ट झोन’ असतो. नवनवीन मित्र-मैत्रिणी जोडणे ही कला अंगीकारण्याऐवजी ओळखीच्या घोळक्मयात मानसिक आधार मिळत असतो. संवाद कौशल्याचा अभाव जोपासण्याला इथेच खतपाणी घातले जाते. पुढच्या पाच वर्षात त्याच परिचित स्वभावाच्या घोळक्मयात त्याच त्या विषयावर गप्पा मारताना एकेक गट तयार होतात आणि महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर मुलाखत देणे, वीस-चाळीस लोकांसमोर आपले मत मांडणे, भाषण करणे, मुद्देसूद वाद-विवाद, चर्चा करणे यामध्ये मराठी मुले मागे पडतात आणि इतर राज्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तुलनेत मराठी विद्यार्थी कमी पडतात आणि नोकरी मिळवण्यात अनंत अडचणी येतात. यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी काय करू शकतात?
शाळा-महाविद्यालयात, नगर वाचनालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. पन्नास जणांसमोर कोणताही विषय मांडताना पहिल्या दोन-तीन वेळेस फजिती होणार, पाय लटपटणार. तरीही या अनुभवातून बरेच काही शिकता येते. अशा स्पर्धेत भाषण करताना पाठांतर करू नये. किमान दहा मुद्दे समोर ठेवून त्या मुद्यांवर अर्धा तास भाषण करता येणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अवांतर वाचन शून्यावर आले आहे. त्यामुळे विविध विषयांवरील मत-मतांतरे असणारी पुस्तके वाचण्यास सुऊवात करून देण्यात पालकांनी हातभार लावणे आवश्यक आहे. महाविद्यालयात शिकताना नियमितपणे चार-पाच मित्र-मैत्रिणींच्या घोळक्मयात राहणे सोडून निरंतर नवे मित्र जमवण्याची कला अंगी बाणावी. महाविद्यालयाच्या वर्गात काही अमराठी विद्यार्थी/नी असल्यास त्यांच्याबरोबर मैत्र जुळवावे.
आठवड्यातून किमान एक वार इंग्रजीमध्ये संभाषण करण्याचा ठरवावा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी. या बाबतीत पंजाब, तामिळनाडू, केरळ अशा राज्यातील युवक मराठी तऊणांच्या तुलनेत बाजी मारतात. याचा अर्थ हे सर्व युवक व्याकरणाच्या दृष्टीने बिनचूक इंग्रजी बोलतात असे नव्हे पण त्यांचा इंग्रजीमधून संवाद साधण्यातला आत्मविश्वास वाखाणण्यासारखा असतो. कोणतीही सभा असो वा ऑफिसमधील मिटिंग असो, महाराष्ट्रातील युवक शक्मयतो मागच्या बाकावर असणे पसंत करतात. पुढे बसल्यास आपल्याला कोणीतरी प्रŽ विचारेल, त्याची उत्तरे देणे जमणार नाही, असा विचार केल्यामुळे करियरमध्ये मराठी विद्यार्थ्यांना त्याचे चटके सहन करावे लागतात. ज्या विषयाची आपल्याला माहिती आहे, त्या विषयावर आत्मविश्वासाने बोलायलाच हवे. अशावेळी चुका होण्याची भीती बाळगू नये. नेहमी एकच चूक न करता, रोज नवीन चुका करायला हव्यात. सौजन्यपूर्ण संवाद साधणे हे कौशल्य मराठी तऊण-तऊणींनी शिकणे आवश्यक आहे. “मोडेन पण वाकणार नाही” सारखी सुभाषिते ऐकून त्याचे सोयीस्कर अर्थ लावल्यामुळे अनेक युवकांचा मराठी बाणा इतका टोकाचा झालेला असतो की आपले काम करून घेण्यासाठी तरी जिभेवर साखर ठेवून संभाषण करणे त्यांना जमत नाही. संभाषण कला म्हणजे लाळघोटेपणा करणे नव्हे. एका रेस्टॉरंटमध्ये चार जणांसाठी टेबल बुक करण्यास सांगितल्यावर फोन घेणाऱ्या मराठी तऊणाने “सगळी टेबल बुक आहेत, जागा नाही” असे उत्तर दिल्यामुळे दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये फोन घेणाऱ्या अ-मराठी युवकाने “आज विकेंड होने के कारण बहुत भीड है, फिर भी आप पंधरा मिनिट में आईये, मै कुछ करता हुं, ताकी आपको ज्यादा देर तक ऊकना नही पडेगा” असे उत्तर दिले. गोड बोलणे हा मराठी माणसाचा अंगभूत गुण नसल्यामुळे अमराठी भाषिकांची दुकाने उत्तमरीत्या चालतात. एखाद्या ब्रँडचे चॉकलेट अथवा चहा पावडर दुकानदाराकडे मागितल्यास मराठी दुकानदार “आमच्याकडे नाही” असे उत्तर देईल. उत्तम संभाषण करण्याची कला अवगत असलेला दुकानदार “या ब्रँडची चहा पावडर घेऊन तर बघा, आवडली नाही तर पैसे परत” असे सांगेल किंवा दुकानात आलेले गिऱ्हाईक परत जाऊ नये यासाठी “आता आमच्याकडे नाही, घरचा पत्ता द्या, आमचा माणूस अर्ध्या तासात घरपोच देईल” असे सांगेल.
बोलण्याचे कौशल्य शिकण्यापूर्वी ऐकण्याचे कौशल्य प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. बोलण्याचे कौशल्य शिकताना समोर बसलेले श्रोते कोणत्या वयाचे आहेत, त्यांची आवड-निवड काय असेल, त्याना आपलेसे करणारी सुऊवात कशी करता येईल, अशा सर्व बाबींचा विचार करावा लागतो. अनोळखी व्यक्तीशी संभाषण करताना मराठी युवकाची देहबोली उद्दामपणा दर्शवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून स्मित हास्य कायम ठेवून संभाषण करण्यास मराठी युवकांना फार कष्ट घ्यावे लागतात. “चॅट जीपिटी बद्दल तुला काय माहित आहे?” असे मराठी तऊणास मुलाखत घेणाऱ्याने विचारल्यास, “त्यातले मला काही माहित नाही” असे मोघम उत्तर न देता, “नाव ऐकले आहे पण त्याबद्दल इथे तपशिलात उत्तर देण्यापूर्वी मला त्याचा अभ्यास करावा लागेल” असे उत्तर दिल्यास मुलाखत घेणारा उमेदवारावर फुली मारणार नाही. “ऊात्त् स aंदल्t ब्दल्rsात्’ि’ या प्रŽाला उत्तर देताना अनेक युवक कौटुंबिक पार्श्वभूमी सांगण्यास सुऊवात करतात. “इतर पन्नास उमेदवारांऐवजी तुझीच निवड का करावी?” या प्रश्न ला उत्तर देताना स्वत:ची पाच गुणवैशिष्ट्यो सांगणे अपेक्षित असते. “मी मेहनती आहे” असे उत्तर दिल्यामुळे निवड होत नसते. अनेक युवकांना उrदल्ज् dग्sम्ल्ssग्दह किंवा ऑफिसमधल्या बैठकीमध्ये आपला मुद्दा इंग्रजीमध्ये प्रभावीपणे अभ्यासपूर्वक मांडता येत नाही. शालेय वर्गामध्ये नेहमी पहिला बाक सोडून शक्मयतो मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे संवाद कौशल्य प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. चार-पाच मित्र-मैत्रिणींच्या घोळक्मयात बोलणे आणि पन्नास जणांच्या घोळक्मयासमोर सभाधीटपणे बोलणे यामध्ये बराच फरक आहे. संभाषण आणि भाषण करताना इंग्रजीमध्ये शब्दप्रभुत्व, आत्मविश्वासपूर्ण देहबोली, विचारांची स्पष्टता, वेळेचे भान अशा अनेक बाबी निरंतर सरावाने शिकाव्या लागतात. कोणताही क्लास लावल्यामुळे हे कौशल्य आपसूक येत नसते. मित्र-मैत्रिणी आणि अनुभवी व्यक्तींशी फोनवर संपर्क साधताना युवकांनी इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव करावा, आपलाच आवाज रेकॉर्ड करून ऐकावा. संवादाचे कौशल्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने रोजचा सराव करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे संवाद कौशल्य सुधारण्याकरीता दहावीच्या परीक्षेनंतर पाल्यास एका सहलीवर किंवा टेकवर पाठवावे, जिथे पाल्यास नवीन मित्र-मैत्रिणी जोडावे लागतील. पालकांनी पाल्याचे बोट सोडण्याची हीच खरी वेळ आहे. अशा सहलीवर पाठवताना ओळखीचे/मित्र-मैत्रिणी/नातेवाईक त्यांच्याबरोबर असू नयेत. त्यामुळे नवीन मित्र जोडण्याची कला या सहलीमध्ये नाईलाजास्तव शिकावी लागेल. सुट्टीत ‘फाडफाड इंग्लिश स्पिकिंग कोर्स’ ला नाव नोंदवल्यामुळे संवाद कौशल्य येत नाही. पालकांना आपण पाल्यासाठी किती खर्च करत आहोत, याचे आंतरिक समाधान मिळते, याव्यतिरिक्त हाती काही लागत नाही. कारण ओळखीच्याच मुला-मुलींशी संवाद साधणारा युवक-युवती अशा क्लासेसला जाऊन सर्वांसमक्ष बोलणे टाळतात. म्हणूनच पालकांनी रोज किमान अर्धा तास पाल्याशी संवाद साधताना, “आज काय विशेष?”, “आज काय शिकलास?”, “आज कोणत्या नवीन मित्र/मैत्रिणीबरोबर ओळख झाली?” असे प्रश्न विचारावेत. पालकांनी पाल्याबरोबर वृत्तपत्रातील बातम्यांवर चर्चा करावी, त्यामध्ये विषयाच्या दोन्ही बाजूंचा विचार करण्यास प्रवृत्त करावे. “गेल्या सत्तर वर्षात भारतात काही झालेच नाही” अशी अभ्यासाचा अभाव असलेली मते पालकांनी युवकांसमोर मांडल्यास युवकांना अभ्यास न करण्याची सवय लागते. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना समोरच्या व्यक्तीस बोलू देणे आणि कोणताही मुद्दा खोडून काढताना त्याला अभ्यासाची जोड देणे हे कौशल्य घरातील संवादामधून मुले शिकतात. घरामध्ये कोणताही एक विषय घेऊन त्यावर विषयाच्या बाजूने आणि विरोधी मतांवर चर्चा करावी. ज्या घरामध्ये पालकांचा पाल्याशी मोकळ्या वातावरणात सुसंवाद नसतो, ज्या घरात मुले धाकाखाली राहतात, त्या मुला-मुलींमध्ये संवाद कौशल्याचा अभाव असतो. पाल्याला त्याच्या आवडत्या कलाकाराचे ऐंध्ऊ अॅनॅलीसीस इंग्रजी भाषेतून करण्यास उद्युक्त करावे. डम्बशेराडस, पिक्शनरी सारखे खेळ कुटुंबात खेळत राहिल्यास सर्वांचेच संवाद कौशल्य वाढते. प्रकाश, पाणी, पर्यावरण, टेनिस, ऑलिम्पिक, करियर, कुटुंब व्यवस्था असे विषय अचानकपणे देऊन त्यावर युवकांना दहा वाक्मये इंग्रजीमध्ये बोलण्यास प्रवृत्त करावे. घरामधील एखादी समस्या सामंजस्यपूर्ण सुसंवादाने सोडवण्याची जबाबदारी पालकांनी आपल्या पुढच्या पिढीला द्यावी. किंग्ज स्पिच, अकीला अँड द बी, द ग्रेट डिबेटर्स, डेड पोएट सोसायटीसारखे उत्तम इंग्रजी चित्रपट सबटायटल्स वाचता वाचता मुलांशेजारी बसून बघावेत.
दहावीच्या परीक्षेनंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठे प्रवेश घ्यावा, करियर कसे निवडावे. त्याबद्दल आपले प्रश्न पाठवू शकता. त्याला पुढील लेखांमध्ये उत्तरे दिली जातील.
सुहास किर्लोस्कर








