कोल्हापूर/ प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आमदार ऋतुराज पाटील यांच्या वतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले. आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मतदासंघातील विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच, गोड खाऊ आणि शुभेच्छा कार्ड याचे वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना याचे वाटप केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या अशा शुभेच्छांमुळे विद्यार्थी भारावून गेले.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सध्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. आ. ऋतुराज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत आ. सतेज पाटील व आ. ऋतुराज पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वातंत्र्य आणि देशभक्तीचे महत्व अधोरेखित करणारे शुभेच्छा कार्ड पाठविले आहे. या शुभेच्छा संदेशामध्ये त्यांनी सांगितले आहे की, भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात लाखो लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. या शूरवीरांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचा त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणे हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची क्षण आहे. ‘विविधतेतून एकता’ जपण्याचे काम सर्व भारतीयांनी आज पर्यंत केले आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया..! आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!









