मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती
बेळगाव : कल्याण-कर्नाटक भागातील 97 पीडीओ (ग्राम पंचायत विकास अधिकारी) नेमणूकीसाठी सिंधनूर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात झालेल्या परीक्षेवेळी प्रश्नपत्रिका वितरण करण्यास अर्धातास उशीरा झाला होता, असे समजते. त्यामुळे परीक्षार्थींनी आक्षेप घेऊन परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ माजविला होता. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी कर्नाटक लोकसेवा आयोगाने तीन सदस्यांची उपसमिती नेमली आहे. उपसमितीकडून मिळणाऱ्या अहवालाची पाहणी करून पुढील कार्यवाही हाती घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार शशील नमोषी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. कल्याण-कर्नाटक भागातील 97 पीडीओंच्या जागासाठी कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटली नव्हता किंवा परिक्षार्थांना प्रश्नपत्रिका वितरण करण्यास विलंब झालेला नव्हता, मात्र परीरक्षार्थींनी विनाकारण गोंधळ माजविला, असे समजून येते. चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीच्या अहवालावरून पुढील कार्यवाही सुरू होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.









