वार्ताहर /उचगाव
बसुर्ते या गावांमध्ये शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी बसुर्ते गावचा संपूर्ण पाठिंबा समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनाच देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी गावातून भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. गावातील सर्व आजी माजी अनेक ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर वयोवृद्ध, युवक, महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचारफेरीला मिळाला.









