सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग : एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन
खानापूर ; सीमाप्रश्नाच्या लढ्यात कुप्पटगिरी गावचे अतुलनिय योगदान आहे. हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांचे गाव असल्याने सीमाप्रश्न सोडवणुकीपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीर राहणार असल्याची ग्वाही दिली. खानापूर तालुका म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ कुप्पटगिरी येथे पदयात्रा आणि सभा पार पडली. यावेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी समितीला मत देण्याचा निर्धार केला. मुरलीधर पाटील म्हणाले, कुप्पटगिरी गाव समितीचा बालेकिल्ला आहे. संघर्षाच्या प्रसंगीदेखील या गावाने कधीही समितीची साथ सोडलेली नाही. माय मराठीच्या रक्षणासाठी या गावातील तऊणांनी दिलेले योगदान विशेष आहे. नेहमी म. ए. समितीच्या पाठीशी खंबीर राहून ग्रामस्थांनी पूर्वजांनी घालून दिलेला स्वाभिमानाचा वारसा जपला आहे. तो या निवडणुकीतही अबाधित राखावा. राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना झुगारून म. ए. समितीचा गड अभेद्य ठेवण्यासाठी कुप्पटगिरी ग्रामस्थांनी एकजुटीने मताधिक्मय द्यावे. समिती आहे म्हणून गावोगावी आज कीर्तने पारायणे होतात. हे नष्ट करण्याचे काम राष्ट्रीय पक्ष करत आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, समितीला मत द्या, असे आवाहन शंकर गावडा यांनी केले. य् ाgवकांनी आपला वडिलोपार्जित समितीचा वारसा राखून ठेवावा. चळवळ टिकवली तर अमाचे अस्तित्व राहील. त्याकरीता भरकटून जाऊ नका, असे विचार निरंजन सरदेसाई यांनी मांडले. समितीच्या विजयासाठी प्राणपणाने इंच इंच खिंड लढवू, असे आश्वासन ज्येष्ठ सीमासत्याग्रही रवळू पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिले. म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, एम. पी. पाटील, जगन्नाथ बिर्जे, केशव कळ्ळेकर, शंकर गावडा, जयवंत पाटील, प्रकाश चव्हाण, मऊ पाटील, निरंजन सरदेसाई, रणजीत पाटील, विठ्ठल गुरव, विठ्ठल पाटील, विजय पाटील, कृष्णाजी पाटील आदी उपस्थित होते.









