बेळगाव – बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी काल सोमवारी पहाटे महापालिकेच्या घंटागाडीतून शहरातील विविध भागात पाहणी दौरा केला. त्यानंतर आज मंगळवारी शहर दक्षिण भागातील नाला व स्वच्छता कामांची पाहणी केली.
आयुक्त दुडगुंटी यांनी काल अचानक पहाटे शहराचा दौरा करून स्वच्छता कामाची पाहणी केली होती. आयुक्तांच्या या आक्रमक पवित्रामुळे मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नगरसेवक गिरीश धोंगडी,नगरसेवक राजीव भातखांडे यांच्या समवेत शहराच्या दक्षिण भागातील कचेरी गल्ली, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, शास्त्रीनगर, गुड शेड रोड,रेल्वे कंपाऊंड या ठिकाणी जाऊन स्वच्छता कामाची पाहणी केली.त्याचबरोबर याच भागातून वाहणाऱ्या नाल्याची पाहणी केली आणि स्वच्छता निरीक्षकांना सूचनाही केल्या. आयुक्तांनी स्वच्छतेबाबत चालविलेल्या धडक दौऱ्याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जाते.