वारणानगर / प्रतिनिधी
येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कारखान्यास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्यान्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेवून कारखान्याने गत गळीत हंगामातील संपूर्ण एफआरपी एक रक्कमी सभासदांना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
भेटीत आमदार डॉ विनय कोरेंची भेट घेवून चर्चा केली. यावेळी साखरेची योग्य वेळी विक्री करुन व्याजावरील होणारा खर्चही कमी केला आहे इत्यादी निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले. तसेच कारखाना कार्यस्थळावर बीओटी तत्वावर चालू असणारा ४४ मे. वॅट को-जनरेशन प्रकल्प नुकताच कारखाना मालकीचा झालेने कारखान्याच्या आर्थिक स्त्रोतामध्ये नक्कीच वाढ होणार असलेचे स्पष्ट केले. एक्सपोर्ट साखर, रॉ शुगर, इथेनॉल उत्पादन तसेच कारखान्याकडे सध्या नोंद असलेल्या ऊस क्षेत्राची माहिती खातेप्रमुखांकडून घेतली. तसेच सर्व कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन करुन केंद्रशासनाच्या धोरणाचा लाभ घेणेचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळीआमदार डॉ. विनय कोरे यांचे हस्ते गायकवाड यांचा सत्कार करणेत आला. वारणा कारखाना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त करुन कारखान्याच्या सध्या सुरु असलेल्या कामकाजाबाबतही समाधान व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे संचालक उदय पाटील, किशोर पाटील,कार्यकारी संचालक शहाजी भगत, सर्व खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.