दिल्लीत 1780 रुपये झाली किंमत : घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑईल कंपन्यांनी मंगळवार म्हणजेच 4 जुलैपासून कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या (19 किलो वजनी) किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत 19 किलो वजनी सिलिंडरची किंमत आता 1,773 रुपयांवरून वाढत 1,780 रुपये झाली आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या (14.2 किलोग्रॅम) किमतीत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही.
कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत आता 1875.50 रुपयांवरून वाढत 1882.50 रुपये झाली आहे. याचबरोबर मुंबईत कमर्शियल सिलिंडरची किंमत 1,732 रुपये झाली आहे. चेन्नईत हाच सिलिंडर 1,944 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे.
सलग तीनवेळा किमती कमी केल्यावर यावेळी कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत वाढविण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये याच्या किमतीत घट करण्यात आली होती. 1 जून रोजी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात 83 रुपयांची घट झाली होती. तर मे महिन्यात कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 171.50 रुपयांनी कमी झाली होती.









