हॉटेल व्यावसायिकांना दिलासा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्यानंतर आता तेल कंपन्यांनीही मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत आता व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 158 ऊपयांनी कमी झाल्या आहेत. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1,522 ऊपयांपर्यंत खाली आली आहे.
तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला एलपीजीच्या किमतीत बदल करतात. ऑगस्टमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 99.75 ऊपयांनी कमी केल्या होत्या. दुसरीकडे, जुलैमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी 7 ऊपयांनी वाढ केली होती. अलीकडेच रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 ऊपयांनी कमी केल्या होत्या. आता दोन्ही प्रकारच्या सिलिंडर दरात कपात झाल्यामुळे सणासुदीच्या उंबरठ्यावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.









