वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. आता दिल्लीत कमर्शियल सिलिंडर 1,680 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकात्यात याची किंमत 1,802 रुपये तर मुंबईत 1,640 रुपये असणार आहे. चेन्नईत कमर्शियल सिलिंडर 1852 रुपयांमध्ये विकला जात आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
तर घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरच्या दरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती वापराचा सिलिंडर 1,103 रुपयांमध्ये मिळत आहे. मुंबईत याची किंमत 1,102 रुपयांमध्ये आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत यापूर्वी 1 मार्च रोजी 50 रुपयांनी वाढविण्यात आली होती. मागील आर्थिक वर्षात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत एकूण 4 वेळा बदल झाला आहे.
जून 2020 पासून एलपीजी सिलिंडरवर बहुतांश लोकांना अनुदान मिळणे बंद झाले आहे. आता केवळ उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत सिलिंडर देण्यात आलेल्यांना 200 रुपयांचे अनुदान प्रतिसिलिंडर मिळत आहे.









