वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्च महिन्याच्या प्रारंभी 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 6 रुपयांनी महाग झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत 6 रुपयांनी वाढून 1,803 रुपये झाली. यापूर्वी तो 1,797 रुपयांना उपलब्ध होत होता. तथापि, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर दिल्लीमध्ये 803 आणि मुंबईत 802.50 रुपयांना मिळत आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,749 रुपयांवरून 6.50 रुपयांनी वाढून 1,755.50 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये सिलिंडर 1,965 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकातामध्ये त्याची किंमत 1,913 रुपये झाली आहे.









