घरगुती सिलिंडरचे दर स्थिर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 5 रुपयांनी कपात केली आहे. यापूर्वी मागील ऑक्टोबर महिन्यात या दरांमध्ये 16.50 रुपयांनी वाढ केली होती. तथापि, घरगुती सिलिंडरच्या किमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारपासून कमर्शियल सिलिंडरच्या बदललेल्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1,590.50 आहे. यापूर्वी ती 1,595.50 होती. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम आदी सर्व कंपन्यांनी सुधारित दर लागू केले आहेत.









