घरगुती सिलिंडरचे दर स्थिर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत 16.50 रुपयांनी वाढ केली आहे. तथापि, घरगुती सिलिंडरच्या किमती कायम राहिल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारपासून कमर्शियल सिलिंडरच्या वाढीव दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता दिल्लीत त्याची किंमत वाढून 1,595.50 रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी तो 1,580 रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये आता तो 1,700.50 रुपयांना उपलब्ध होईल, म्हणजेच 16.50 रुपयांनी वाढ झाली आहे. देशाच्या अन्य भागात हे दर वेगवेगळे आहेत.









