प्रतिनिधी /बेळगाव
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व आरोग्य विमा सेवेत अव्वल असणारी स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी यांच्यात नुकताच व्यावसायिक करार झाला. लोकमान्य सोसायटीच्या मल्टिपर्पज सेवेअंतर्गत आणखी एक भर पडली आहे.
लोकमान्य सोसायटी विविध ग्राहकोपयोगी विमा सेवा पुरविण्याबद्दल प्रख्यात आहे. विविध नामंकित विमा सेवा लोकमान्यतर्फे देण्यात येतात. स्टार हेल्थ इन्शुरन्स वरि÷ नागरिकांसाठी विशेष आरोग्य विमा सेवा प्रदान करते. या सामंजस्य करारामुळे लोकमान्य सोसायटीच्या सर्व ग्राहकांसाठी सोयिस्कर विमा सेवा मिळणार आहे. याप्रसंगी लोकमान्यचे सीईओ अभिजित दीक्षित, स्टार हेल्थ इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक गुरविंदर सिंग, व्यवस्थापक प्रणव शिशिर, लोकमान्यचे इन्शुरन्स प्रमुख राहुल पाटील व इन्शुरन्स व्यवस्थापिका रेश्मा उपाध्ये आदी उपस्थित होते.









