दुष्काळ निवारण्याचे बाप्पाला साकडे
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे भरपूर पाऊस होऊन चांगले उत्पन्न मिळावे, या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सामूहिक आरती करण्यात आली. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील गणेशोत्सव मंडळामध्ये महाआरती करण्यात आली. या उपक्रमाला सुरुवात झाली असून आता प्रत्येक गणेशोत्सव मंडळासमोर सामूहिक आरती केली जाणार आहे.शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे व त्यांच्या पत्नी शुभदा गावडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना किरण गावडे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात तरुणाई एकत्र यावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. परंतु, सध्या गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असून मंडळांचे पदाधिकारी भान विसरले आहेत. उत्सवामध्ये जागृती, प्रबोधन बाजूला ठेवून डीजेवर धिंगाणा सुरू आहे. यातून धर्मरक्षण व धर्मसंस्कार कसे होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, कार्यवाह कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, अमित लगाडे, गजानन पवार, राजू पोटे, विलास लाड, शशिकांत खासबाग, सचिन हंगिरगेकर, भरत बागी, राजू वरपे, किरण गवळी, रमेश करविनकोप्प, अनंत खानापुरे आदी उपस्थित होते.